Safe Bleaching Tips चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्वचेवर चमक येण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनाही ब्लीच लावायला आवडते. निस्तेज, निर्जीव आणि कोमेजलेल्या त्वचेवर काही मिनिटांत चमक आणण्याचे काम करते. म्हणूनच जेव्हा लोकांकडे कमी वेळ असतो तेव्हा ते नैसर्गिक पद्धतींऐवजी चेहरा ब्लीच लावणे पसंत करतात. विशेषत: जेव्हा कोणाच्या घरी पार्टी, लग्न किंवा कोणताही सण असेल तेव्हा लोकांना चेहऱ्यावर ब्लीच लावायला आवडते.
पण जर ब्लीच नीट लावले नाही किंवा त्याच्या वापरात काही चूक झाली तर त्यामुळे त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. ब्लीच लावताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या चुकांमुळे नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.
ब्लीच लावण्यापूर्वी हे करा
पॅच टेस्ट -चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर ब्लीच लावा. 10-15 मिनिटे थांबा आणि नंतर स्वच्छ करा. त्यानंतर 30 मिनिटे थांबा आणि त्वचेवर काही प्रतिक्रिया आहे की नाही ते पहा. जर त्वचेवर कोणताही बदल किंवा ऍलर्जी दिसून येत नसेल तर चेहऱ्यावर ब्लीच लावा.
क्लीन फेस - चेहर्यावर ब्लीच अप्लाय करण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करा. चिकट त्वेचवर ब्लीच इफेक्ट येत नाही.
ब्लीच आणि एक्टिवेटर प्रमाण- साधारणपणे ब्लीच पॅकेटमध्ये क्रीमच्या प्रमाणात जास्त ऍक्टिव्हेटर असते. परंतु अधिक ग्लोसाठी, जास्त ऍक्टिव्हेटर पावडर मिसळू नका, त्याऐवजी पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे एक्टिव्हेटर आणि क्रीम मिसळा. जास्त प्रमाणात ऍक्टिव्हेटर जोडल्याने त्वचा बर्न होऊ शकते आणि रंग खराब होऊ शकतो.
ब्लीच लावताना या चुका टाळा-
योग्य बाऊलमध्ये ब्लीच तयार करा. ब्लीच पाउडर आणि एक्टिवेटर मिसळण्यासाठी स्टील, तांबा किंवा कोणत्याही मेटलचा वापर करु नका. नेहमी काच किंवा प्लास्टिक बाऊल वापरा. मेटलसोबत एक्टिवेटर आणि ब्लीच पावडरमध्ये आढळणारे केमिकल्स मेटलसोबत रिअॅक्ट करु शकतात.
उन्हात जाणे टाळा कारण ब्लीच लावल्यानंतर स्किन सेंसिटिव्ह होते आणि उन्हाच्या संपर्कात येऊन जळजळ होऊ लागते.
प्रदूषणापासून वाचा. ब्लीच लावल्यानंतर काही दिवस त्वचेला ऊन-प्रदूषण यापासून वाचवून ठेवावे.