Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस गळणे आणि कोंडा कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे फायदे जाणून घ्या

Fennel Seeds Benefits For Hair
, सोमवार, 5 मे 2025 (00:30 IST)
आजच्या धकाधकीच्या चुकीच्या जीवनशैली,खाण्याच्या सवयी, रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. केसांची गळती होणे, अवकाळी केस पिकणे, कोंडा होणे या सारख्या समस्या उदभवतात. प्रत्येक महिलेला सुंदर केसांची आवड असते. केसांची गळती आणि कोंड्यामुळे केसांचे सौंदर्य नाहीसे होते. या वर उपाय आहे बडीशेप. बडीशेपचा वापर करून केसांच्या समस्येला सोडवू शकतो. बडीशेप केसांचा कोंडा कमी करून केस मजबूत करते. कसे काय ते जाणून घेऊ या.
केसांसाठी बडीशेपचे फायदे 
केसांना मजबूत करते 
बडीशेपमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात जे केस मजबूत करण्यास आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करतात. 
 
केसांची गळती रोखते 
बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात हे केस गळती रोखण्यास आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.
 
केसांना चमकदार बनवणे
बडीशेपमध्ये असलेले पोषक घटक केसांना चमकदार आणि निरोगी बनवतात, ज्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.आणि केस चमकदार बनतात.
कोंडा दूर करते 
बडीशेप मध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. हे डोक्यातील कोंडा निर्माण करणाऱ्या टाळूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि लोह केसांचे आरोग्य आणखी सुधारते.
 कसे वापरावे 
बडीशेप पाणी:
बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याने केस धुवा. हे टाळू स्वच्छ करते आणि केस निरोगी ठेवते.
बडीशेप तेल:
बडीशेप तेलात गरम करा, ते गाळून घ्या आणि या तेलाने केसांच्या मुळांना मालिश करा. हे केसांना पोषण देते आणि ते मजबूत बनवते.
बडीशेप पेस्ट:
बडीशेप बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि ती टाळूवर लावा. 20-30 मिनिटांनी धुवा. हे केसांच्या मुळांना पोषण देते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sunday special recipe दही सँडविच