Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गडद मंडळे काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Follow these home remedies to remove dark circles DARK CIRCLE HOME REMEDIES IN MARATHI  MARATHI BEAUTY TIPS TO REMOVE DARK CICLES FOLLOW THESE HOME REMEDIES GADAD MANDALE KADHNYASATHI TIPS
, गुरूवार, 11 मार्च 2021 (08:30 IST)
गडद मंडळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात,बाजारात गडद मंडळे कमी  करण्यासाठी काही उत्पादन येतात पण ते सौंदर्यासाठी हानिकारक असतात. गडद मंडळे कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा.
 
या साठी आपण हे साहित्य वापरावे. 
* 1  बटाटा, 1 चमचा कोरफड जेल 
कृती -
बटाटे किसून घ्या, नंतर ते गाळून त्याचा ज्यूस बनवा.यामध्ये 1 चमचा कोरफड जेल मिसळा ही पेस्ट कापसात भिजवून डोळ्याच्या खाली लावा. मसाज करून 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. 
फायदे- बटाट्याचा रस लावल्याने गडद मंडळे कमी होतात.कोरफड जेल कोरड्या त्वचेला मॉइश्चराईझ करतो. थकवा कमी जाणवतो. 
 
* काकडी ,बदामाचे तेल 
अर्धी काकडी किसून घ्या. नंतर गाळून ज्यूस एका वाटीत काढा या मध्ये बदामाचे तेल मिसळा कापसाच्या साहाय्याने या मिश्रणाला डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा नंतर हे काढून वर्तुळाकार मॉलिश करा. रात्र भर तसेच ठेवा 
 
फायदे- बदामाचे तेल पोषण देतात आणि त्वचेसाठी देखील हे चांगले आहे. 
आपण देखील हे उपाय अवलंबवून गडद मंडळे कमी करू शकता. नियमाने हे वापरल्याने गडद मंडळे नाहीसे होतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसांसाठी रामबाण आहे शिकाकाई नक्की वापरा