Festival Posters
✕

काजळ लावताना या टिप्स अवलंबवा, चेहरा काळवंडणार नाही

Webdunia
शुक्रवार, 6 जून 2025 (00:30 IST)
मेकअप करायला कोणाला आवडत नाही? पण कधीकधी असे घडते की मेकअप केल्यानंतर काही काळानंतर चेहरा काळवंडू लागतो, विशेषतः काजळ लावल्यावर. महिला आणि मुलींना काजळ लावताना या समस्याला सामोरी जावे लागते काजळ डोळ्यांखाली पसरतो किंवा चेहरा काळा पडतो 
ALSO READ: आयलायनर जास्तकाळ कसे टिकवाल या टिप्स अवलंबवा
यामुळे संपूर्ण लूक खराब होतो आणि चेहरा थकलेला किंवा घाणेरडा दिसू लागतो. चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या ब्युटी टिप्सबद्दल, ज्या तुम्ही दररोज मेकअप करताना वापरू शकता.
 
प्रायमर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा
जर तुम्ही मेकअप केला असेल तर काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांखालील भागावर थोडासा प्राइमर किंवा फेस पावडर लावा. यामुळे त्वचा कोरडी राहील आणि काजळ जास्त काळ टिकेल.
 
डोळे नीट स्वच्छ करा
मेकअप करताना आणि काजळ लावण्यापूर्वी, डोळ्यांभोवतीचा भाग स्वच्छ आणि तेलमुक्त ठेवा. जर त्वचेवर तेल किंवा घाण असेल तर काजळ लवकर पसरू शकते.
ALSO READ: उन्हाळ्यात वारंवार चेहरा धुण्यामुळे होऊ शकतात या समस्या, महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
काजळ लावण्याची योग्य वेळ निवड 
मेकअप करताना नेहमी लक्षात ठेवा की काजळ सर्वात शेवटी लावा.
प्रथम बेस, आयशॅडो, मस्कारा आणि नंतर शेवटी काजळ लावा. यामुळे काजळ जास्त काळ टिकेल आणि स्पष्टपणे दिसेल.
 
वारंवार डोळे चोळू नका
जर तुम्हाला तुमचा काजळ दिवसभर टिकवायचा असेल, तर वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे किंवा चोळणे टाळा. तसेच, फक्त वॉटरप्रूफ आणि चांगल्या दर्जाचे काजळ वापरा.
ALSO READ: चेहऱ्यावर हळदीची पेस्ट लावण्याने हे फायदे मिळतात, कसे वापराल
आयलायनर लावा
काजळ लावल्यानंतर, आय लाइनर वापरून वरच्या दिशेने एक पातळ रेषा काढा. यामुळे काजळ लॉक होईल आणि पसरणार नाही.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

जिममध्ये जायला वेळ नाही? रोज फक्त १५ मिनिटे घरी करा हे ५ सोपे व्यायाम

मैत्रीची परीक्षा; बकरी आणि तिच्या मित्रांची लघु कथा

"यंदाची कोजागिरी करा अजून खास; ट्राय करा दुधाचे हे ५ युनिक आणि टेस्टी फ्लेवर्स!"

पुढील लेख
Show comments