Publish Date: Fri, 30 Oct 2026 (00:30 IST)
Updated Date: Thu, 29 Oct 2026 (21:45 IST)
Dandruff : अनेक लोकांना केसातल्या कोंड्यामुळे होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागत असतो. ही समस्या वारंवार डोकं वर काढत असते.कोंडा ही समस्या तशी अगदीच सर्वसामान्य आहे.
कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत.या बुरशी किंवा फंगसचे नाव मालासेजिआ ग्लोबोसा हे आहे. प्रामुख्यानं या फंगस मुळेच ड्रँड्रफची समस्या उद्भवते. हे फंगस त्वचा आणि केसांमधून तेल शोषून घेतं आणि ओलेइक नावाचं एसिड तयार करत या मुळे केसांना खाज येते. तसेच वायू प्रदूषणामुळे देखील केसात कोंडा होतो. केसातील कोंड्यामुळे कुठेही समारंभात जाण्यासाठी देखील अपमानास्पदहोते. कोंडा दूर करण्याचे काही चांगले उपाय आहे. चला जाणून घेऊ या.
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी उपाय-
-
नियमितपणे केस विंचरणे.
-
अँटी फंगल अँटी डेंड्रफ शाम्पूचा नियमित वापर करावा.
-
कोरफडीचा रस लावून केसांना मसाज करणे.
-
नारळाच्या तेलात कापूर मिसळून मसाज करावी.
-
पाणी -व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावावा.
-
दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोनचमचे पाणी घेऊन मिसळून केसांना लावा नंतर 15 मिनिटांनी धुवून घ्या.कोंडा कमी होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.