Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गळणाऱ्या केसांसाठी होममेड शॅम्पू, केस दुप्पटीने वाढतील

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (21:43 IST)
लांब आणि दाट केस असावेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण आजकाल बदलणाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, वाढते प्रदूषण आणि धूळ-माती यामुळे केसांच्या सर्व समस्या उद्भवू लागतात. आजच्या काळात बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे केसांचे दीर्घकाळ नुकसान होते. केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही नैसर्गिक वस्तूंच्या मदतीने घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवू शकता.
 
1 आवळा, शिककाई आणि रीठा शैम्पू -

साहित्य-
1 वाटी रीठा पावडर 
1/2 वाटी आवळा पावडर 
1/2 वाटी-शिककाई 
1/2 वाटी-फ्लेक्स सीड्स   
 
शॅम्पू बनवण्याची कृती - 
 सर्व प्रथम, एका पॅनमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी उकळवा. पाण्याला उकळी आली की त्यात एक एक करून सर्व साहित्य टाका. आता किमान 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवा. आता चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. लक्षात ठेवा की हे मिश्रण जास्त घट्ट नसावे. केस धुण्यासाठी हे  सामान्य शैम्पूप्रमाणे वापरू शकता.
 
 
2 कोरफड शैम्पू
साहित्य
1/4 कप -कोरफड  जेल  
 2 चमचे  मध 
2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर 
 
शॅम्पू बनवण्याची कृती - 
कोरफड जेल एका भांड्यात घ्या. आता त्यात मध आणि सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. फेस येईपर्यंत हाताने फेणून घ्या. इच्छित असल्यास, शैम्पूमध्ये सुगंध वाढविण्यासाठी असेन्शियल ऑइल चे काही थेंब घालू शकता.  केस धुण्यासाठी सामान्य शैम्पूप्रमाणे वापरा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments