Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिपस्टिक वापरण्यापूर्वी तपासा! एक्स्पायर झालेली आहे की नाही, असे ओळखा

expired lipstick
सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करतात. चांगले कपडे परिधान करतात. चांगला मेकअप करतात. या मध्ये लिपस्टिक त्यांचा लूक छान बनवण्यात खूप मदत करते. या साठी महिला लिपस्टिकचे अनेक रंग निवडतात आणि वेळोवेळी त्यांच्या आवडीनुसार आणि ड्रेसच्या मॅचिंगनुसार लावतात.
ALSO READ: नवरात्रीच्या गरब्यात मेकअप राहावा रात्रभर फ्रेश; या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स नक्की फॉलो करा
पण लिपस्टिकची संख्या जास्त असल्याने अनेक वेळा काही लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहतात, तर काही लिपस्टिक एक्स्पायर होतात. अशा परिस्थितीत जर आपण एक्स्पायर झालेले  लिपस्टिक वापरले तर अनेक नुकसान होऊ शकत. एक्स्पायर झालेली लिपस्टिक कशी ओळखायची जाणून घेउ या.
 
1 लिपस्टिक मधून दुर्गंध येते - आपण लिपस्टिक उघडताच किंवा लावताच, एक सुंदर चवीचा सुगंध येतो, जर आपल्याला लिपस्टिक मधून दुर्गंध येत असेल तर अशा लिपस्टिकचा वापर करणे टाळा कारण ही लिपस्टिक वापरण्यासाठी योग्य नाही.
2 लिपस्टिक वर थर दिसून येते- जर आपल्याला लिपस्टिकवर पाण्याच्या थेंबासारखा थर दिसला तर ते  लिपस्टिक एक्स्पायर झाल्याचे लक्षण आहे. अशी लिपस्टिक अजिबात वापरू नका आणि त्या जागी नवीन लिपस्टिक लावा.
 
3 लिपस्टिक कोरडी होते- जेव्हा आपण कोणतीही लिपस्टिक आणतो तेव्हा ती खूप चांगली  आणि ओलसर असते ज्यामुळे ती आपल्या ओठांवर सहज लावता येते. पण जर आपल्या  लक्षात आले की आपली लिपस्टिक कोरडी होऊ लागली आहे, तिचा पोत बदललेला आढळला तर ती चुकूनही वापरू नका.
4 लिपस्टिक ला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक झाली असल्यास-  प्रत्येक लिपस्टिकची एक्सपायरी डेट वेगळी असली तरी ती साधारणपणे दोन वर्षांसाठीच असते. त्यामुळे आपल्या लिपस्टिकला 2 वर्षांपेक्षा अधिक झाले असल्यास तर ती बदलण्याची वेळ आली आहे. लिपस्टिकच्या बाटलीवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटवरून आपल्याला कळू शकते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Navratri 2026 विशेष ट्रेंडी, चविष्ट आणि झटपट होणारे 'मखाना-पनीर अप्पे' नक्की ट्राय करा