नारळ तेलाचे बरेच फायदे आहेत. हे प्रत्येक हंगामात अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेसाठी फायदेशीर.आहे तसेच गंभीर जखम झाल्यावर हे मुलांसाठी देखील वापरले जाऊ शकते. ,
नारळ तेल कोणत्याही प्रकारची जळजळ, खाज होण्यावर वापरले जाते. सौंदर्य देखील त्याच्या वापरण्याने उजळते. आपण नारळाच्या तेलाचा वापर करून सुंदर कसे दिसू शकता हे जाणून घ्या -
1 नाभीवर लावावे-लोकांचे ओठ कोरडे झाल्यावर लवकर फाटतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नारळाचं तेल लावून झोपा.असं 15 दिवस करा.यामुळे आपले ओठ मऊ होतील आणि त्यावरील त्वचा देखील निघणार नाही.
2 पुरळ,खाज येणे,कोरडी त्वचा - त्वचेला या तिन्ही समस्या असतील तर नारळ तेल लावा.या तिन्ही समस्यां पासून मुक्ती मिळून त्वचा मऊ होईल.
3 चमकदार त्वचा - रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल कोमट करून मानेवर आणि त्वचेवर हळुवारपणे मॉलिश करा.असं केल्याने आपली त्वचा खूप मऊ आणि चमकदार बनेल.
4 सुरकुत्यापासून संरक्षण- नारळाच्या तेलात ओमेगा 3 असण्यासह अँटीएजिंग घटक आढळतात. हे नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होऊन सुरकुत्या कमी होतील.
5 मेकअप रिमूव्हर - आपल्याकडे मेकअप रिमूव्हर नसल्यास आपण नारळ तेल देखील वापरू शकता. कापसाच्या बॉलवर तेल घेऊन 2 मिनिटांत सहजपणे मेकअप स्वच्छ करा.
6 नखे उजळतील - होय, नखे उजळण्यासाठी देखील नारळ तेल वापरू शकता. नेल पॉलिश साफ केल्यानंतर, आपले नखे पूर्णपणे कोरडे दिसतात नखांवर नारळ तेल लावा.नखे चमकतील.
7 स्ट्रेच मार्क्स काढते- गरोदर पणात खाज आल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. त्यांना कमी करण्यासाठी डॉक्टर देखील नारळाचं तेल लावण्याचा सल्ला देतात.तसेच शरीरावर कुठे ही जखम झाली असल्यास दररोज नारळाचं तेल लावू शकता.डाग कमी होतात.