चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे आणि यासाठी योग्य वेळी चेहऱ्याचे फेशिअल करणे देखील आवश्यक आहे. परंतु जेव्हा सध्या सर्वत्र लॉक डाऊन लागले आहेत तर या वेळी पार्लर मध्ये जाऊन फेशिअल करणे अशक्य आहे.तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही.आपण घरात देखील पार्लर सारखे फ़ेशियल करू शकता कसे काय चला तर मग जाणून घेऊ या.
चला तर मग जाणून घेऊया काही खास टिप्स ज्याद्वारे आपण घरी फेशियल करू शकता.
* सर्व प्रथम, आपल्या केसांना व्यवस्थित बांधा जेणेकरुन ते फेशिअल करताना चेहऱ्यावर येणार नाही.
* आता चेहरा धुवून घ्या. यासाठी आपण फेस वॉश देखील वापरू शकता.
* या नंतर कच्च दूध घ्या आणि त्याने आपल्या चेहऱ्याची मॉलिश करून कापसाने त्वचा पुसून घ्या.
* या नंतर स्क्रबची पाळी येते या साठी आपण तांदुळाचे पीठ घ्या आणि त्यात 1 चमचा दही आणि काही थेंब लिंबाचा रस घाला.आणि याने चेहऱ्यावर स्क्रब करा.आता चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या .एका वाटीत 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध घ्या आणि चेहऱ्यावर मॉलिश करा.त्यानंतर चेहरा कापसाने स्वच्छ करून घ्या किंवा आपण चेहरा पाण्याने देखील स्वच्छ करू शकता.आता चेहरा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
* आता स्टीम करण्याची पाळी येते.या साठी आपण पाणी गरम करा आणि त्यावर एक टॉवेल घालून स्टीम घ्या.
या नंतर शेवटी चेहऱ्यावर फेसपॅक लावा.
फेसपॅक बनविण्यासाठी -
1 चमचा हरभराडाळीचे पीठ,1 चमचा गव्हाचे पीठ,आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा .आपण त्यात टोमॅटोचा रस देखील मिसळू शकता आणि चेहऱ्यावर आणि माने वर लावा कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.