तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता? घरगुती उपाय करून बघता जर ते काम करत नसेल तर महाग उत्पादने खरेदी करा. ते पुरेसे नसले तर ब्युटी पार्लरमध्ये तासनतास घालवता आणि हजारो खर्च करायला देखील पुढे मागे बघत नाही...पण तुम्हाला विश्वास बसेल का की याशिवाय देखील चमकणारी त्वचा मिळवता येते. तेही अगदी कमी किमतीत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त पाच रुपयांच्या व्हॅसलीनने त्वचा उजळू शकता.
घरी तयार करा व्हॅसलीन ब्लीच
व्हॅसलीन ब्लीच बनवण्यासाठी तुम्हाला टोमॅटो, हळद पावडर आणि व्हॅसलीन लागेल. हे ब्लीच बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. टोमॅटो प्युरीमध्ये फक्त हळद घाला आणि व्हॅसलीन घाला. ब्लीच तयार आहे.
व्हॅसलीन ब्लीच कसे लावावे
हे व्हॅसलीन ब्लीच लावण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. जेणेकरून ब्लीचचा प्रभाव अधिक दिसून येईल. आता चेहऱ्यावर ब्लीचचा जाड थर लावा आणि किमान तीस मिनिटे थांबा. तीस मिनिटांनी चेहरा धुवा किंवा जेव्हा तुम्हाला ब्लीच सुकल्यासारखे वाटेल तेव्हा ते धुवा.
तुम्ही किती वेळा ब्लीच लावू शकता
हे ब्लीच तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. हे देखील लक्षात ठेवा की कोणत्याही लग्न किंवा पार्टीला जाण्यापूर्वी एक दिवस आधी हे ब्लीच लावा. हे देखील लक्षात ठेवा की त्वचा अधिक तेलकट असेल तर टोमॅटोचे प्रमाण वाढवा आणि व्हॅसलीनचे प्रमाण थोडे कमी करा.