Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Hair Spa घरीच बनवा क्रीम आणि घरातच करा पार्लर सारखा हेअर स्पा

Hair Spa घरीच बनवा क्रीम आणि घरातच करा पार्लर सारखा हेअर स्पा
, गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (16:09 IST)
लांब आणि सुंदर चमकदार केसांची आवड कोणाला नसते. परंतु धूळ आणि केसांना पुन्हा-पुन्हा उष्णता दिल्यामुळे केसांचे सौंदर्य हळू-हळू कमी होत आहे. या साठी पार्लरमध्ये जाऊन स्पा करणं हेच एकमेव पर्याय आहे. पार्लरमध्ये जाऊन आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात. दरवेळी पार्लरला जाऊन एवढे पैसे खर्च करणं ते ही शक्य नसतं.
 
तसेच, कोरोना काळात बहुतेक लोकं पार्लर जाणं टाळतच आहे. जर आपण पार्लर न जाता घरातच हेअर स्पा करण्याचा विचार करीत असाल तर आम्ही आज आपल्याला या लेखामधून घरातच हेअर स्पा क्रीम बनवायला सांगत आहोत. जेणे करून आपण स्वतःच घरातच हेअर स्पा करू शकता, त्याच बरोबर आपल्या वेळेची आणि पैशांची देखील बचत होऊ शकते. 
 
साहित्य -
2 चमचे ऑलिव्ह तेल, 1 चमचा नारळाचं तेल, 1 चमचा ग्लिसरीन, 4 ते 5 चमचे कोरफड जेल, 4 चमचे आपण वापरत असलेले हेअर कंडिशनर किंवा हेअर पॅक. 
 
कृती -
1 सर्वप्रथम एका वाटीत ऑलिव्ह तेल घ्या, कोरफड जेल, ग्लिसरीन, हेअर पॅक किंवा कंडिशनर मिसळून घ्यावं.
2 हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
3 आता नारळाचं तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात मिसळून चांगल्या प्रकारे केसांच्या मुळात लावा.
4 आता जी स्पा क्रीम आपण तयार केली आहे, ती आपल्या केसांमध्ये चांगल्या प्रकारे लावा.
5 टॉवेल ला गरम पाण्यात बुडवून याला आपल्या केसांमध्ये गुंडाळून घ्या आणि काही काळ तसेच राहू द्या आणि काही वेळ वाफ घ्या. असे किमान 4 ते 5 वेळा करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळी चपला खरेदी करताना...