suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मशरूम केसांना काळे करण्यासाठी फायदेशीर आहे, इतर फायदे जाणून घ्या

mashroom benefites
केसांना घनदाट आणि काळे भोर बनविण्यासाठी मशरूम फायदेशीर आहे.आपल्या आहारात याचा समावेश करावा. या मध्ये व्हिटॅमिन डी,अँटीऑक्सीडेंट,खनिजे,जसे की सेलेनियम आणि कॉपर आढळतात. हे केसांना निरोगी बनवतो कसे काय चला तर मग जाणून घेऊ या. याचे फायदे   

 केस गळण्यापासून आराम मिळतो- 

ज्या स्त्रियांना केसांच्या गळतीचा त्रास आहे त्यांनी मशरूम वापरावे. या मध्ये अँटी मायक्रोबियल, अँटी बेक्टेरियल आणि इतर पोषक घटक आढळतात जे स्कॅल्प ला स्वच्छ करून केसांची वाढ करतात.

   केसांना निरोगी ठेवतो- 

या मध्ये कॉपर आढळतो जे अन्नातून आयरन शोषून घेत, या मुळे केसांचा रंग काळा राहतो. कॉपर आणि आयरन दोन्ही मिळून केसांना निरोगी आणि बळकट करतात. 

  केसांची वाढ करतो-

मशरूम मध्ये मुबलक प्रमाणात सेलेनियम आढळते, जे केसांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हे सेलेनियम स्कॅल्प वरील फंगस नाहीसे करतो. केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवणानंतर लगेच चहा पिणे ही एक गंभीर समस्या असू शकते; तोटे जाणून घ्या…