Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Neem face mask कडुलिंब चेहऱ्यावर लावा, तुमची त्वचा चमकदार होईल

Neem face mask कडुलिंब चेहऱ्यावर लावा, तुमची त्वचा चमकदार होईल
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (17:07 IST)
हिवाळ्याच्या काळात प्रत्येकाची त्वचा कोरडी पडू लागते आणि चेहऱ्याची चमक नाहीशी होते. साहजिकच अशा परिस्थितीत त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचा चेहरा चमकदार हवा असेल तर एक उत्तम उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जे हिवाळ्यात तुमची त्वचा फ्रेश ठेवेल. इतकेच नाही तर प्रत्येकाला तुमच्या या सौंदर्याचे रहस्य जाणून घ्यायला आवडेल. यासाठी तुम्हाला फक्त कडुलिंबाचा वापर करावा लागेल. होय, तुम्हाला तुमच्या घराजवळ कडुलिंब मिळेल. कडुलिंबाचा उपयोग बहुतेक आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो. लोक कडुलिंब आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा भरपूर वापर करतात. त्याचे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुरुम आणि मुरुमांच्या डाग काढून टाकण्यास मदत करतात. कडुलिंबापासून तुम्ही अनेक प्रकारचे नैसर्गिक घरगुती कडुलिंबाचे फेस पॅक बनवू शकता आणि ते चेहऱ्यावर लावू शकता.
 
चेहरा स्वच्छ करण्यासाठी कडुलिंब फेस मास्क skin cleansing Neem face mask
कडुलिंब आणि मध फेस पॅक ऑयली त्वचेसाठी
मूठभर कडुलिंबाचे पान घेऊन जरा पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. यात एक मोठा चमचा ऑर्गेनिक मध मिसळा. हा पॅक चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. 30 मिनिटानंतर धुवा. हा पॅक ऑयली त्वचेसाठी उत्तम घरगुती उपाय आहे. याने चेहर्‍यावर येणारं अतिरिक्त ऑयलची समस्या दूर होते आणि थकलेली त्वचा पुन्हा ऊर्जावान होण्यास मदत मिळते.
 
कडुलिंब आणि बेसन फेस पॅक दूर करतील पिंपल्स 
एक वाटीत एक मोठा चमचा बेसन आणि कुडुलिंबाची पावडर घ्या. यात जरा दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ करुन हा मास्क पूर्ण चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटाने धुवा. हा मास्क आठवड्यातून 2 वेळा वापरा. आपल्या चेहर्‍यावर अधिक प्रमाणात मुरुम असतील तर हा पॅक लावल्याने आराम मिळेल. चेहर्‍यावरील डाग देखील कमी होती आणि चेहर्‍याची चमक वाढेल.
 
कडुलिंब आणि एलोवेरा फेस पॅक चेहर्‍यावर ग्लो आणेल
एका वाटीत 1 चमचा कडुलिंब पावडर घ्या. यात 2 मोठे चमचे एलोवेरा जेल मिसळा. आता त्वचा कॉटन बॉलच्या सह्याने गुलाबपाण्याने स्वच्छ करुन घ्या. मग ही पेस्ट त्वचेवर लावा. 15 मिनिटाने धुवा. नंतर चेहरा टॉवेलने पुसून घ्या. कडुलिंब आणि एलोवेरा योग्य साहित्य आहे. हे रूटीनमध्ये सामील करुन आपण चेहर्‍यावरील घाण दूर करु शकता आणि चेहर्‍यावरील चमक आपोआप जाणवेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga For Hair : दररोज करा हे योगासन, गळत असलेल्या केसांपासून मुक्ती मिळेल, दुप्पट वेगाने वाढतील केस