Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या सहा कारणांमुळे केस होतात पातळ

Webdunia
केस लाँग असो वा शॉर्ट, दाट असले तर सुंदर दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. केस दाट करण्यासाठी महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.
 
अती तेल लावणे
जर आपण केसांमध्ये सतत तेल चोपडत असाल तर स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची ग्रोथ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात.
 
केस रगडून धुणे
शैम्पू करताना आपण केसांना रगडून-रगडून धुवुत असाल तर ही सवय सोडा. याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. शैम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा.
 
ओले केस विंचरणे
ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा.
 
केसांमध्ये हीटचा प्रयोग
जर आपण केसांवर ‍हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.
 
ताण घेणे
ताण घेणे सोडा. स्ट्रेस लेवल अधिक असल्यास केस पातळ होऊ लागतात. खूश राहण्याचा प्रयत्न करा मग बघा याचा परिणाम आपल्या केसांवरही दिसून येईल.
 
क्रॅश डाइट
केस मजबूत होण्यासाठी हेल्थी आणि बॅलेस डाइट गरजेची आहे. आपल्या आहारात भरपूर आयरन आणि प्रोटिनचा समावेश करा. दुबळं दिसण्याच्या क्रेझमुळे क्रॅश डाइट करणे योग्य नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असाल तर हे 3 रिलेशनशिप नियम वापरून पहा

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पुढील लेख
Show comments