हीट स्टाइलिंग उत्पादने किंवा रसायनांमुळे आपले केस खराब होतात पण सत्य हे आहे की केस तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी जर केसांची काळजी घेतली नाही तरकेस तुटणे आणि गळणे सुरू होते. अशा काही छोटया छोटया टिप्स आहेत ज्या रात्री झोपताना तुमच्या केसांची काळजी घ्यायला मदत करतील. तर चला टिप्स जाणून घेऊ या
१. व्यवस्थित उशी घेणे-
चुकीची उशी आणि तिचे कवर पण केसांचे नुकसान करू शकतात. जर का तुम्ही केसांची काळजी घेऊ इच्छिता तर साटन किंवा रेशमी कवर असलेल्या उशीचा वापर करा. ते इतर कपड्यांच्या तुलनेत गुळगुळीत असतात. त्यामुळे केस कमी प्रमाणात नुकसान करतात.
२. केस मोकळे नसावे-
खूप वेळेस आपण मोकळे केस करून झोपायला जातो. यामुळे केसांना खूप नुकसान होते अशा परिस्थितीत नेहमी प्रयत्न करा की झोपण्यापूर्वी केसांची कोणतीही प्रोटेक्टिव हेयर स्टाइल नक्की करा. हेयर स्टाइल अशी करा की ती घट्ट नको आणि झोपतांना देखील आरामदायक वाटले पाहिजे.
३. लाइट हेयर सीरमचा वापर करा-
नियमित झोपतांना उशीवर आपले डोके करवट बदलतांना घर्षण झाल्यामुळे सुद्धा केसांची समस्या उद्भवू शकते.त्यामुळे नेहमी झोपण्यापूर्वी हेयर सीरम लावायचा प्रयत्न करा.
४. केस जरूर विंचरणे-
रात्री झोपण्यापूर्वी केस जरूर विंचरणे आणि ते गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही केसांना विंचरतात तेव्हा स्कॅल्प चे नैसर्गिक तेल केसांमध्ये मुळापासून टोकापर्यंत समान रीतीने पसरतात.