Marathi Biodata Maker

लग्नात पाऊस पडणे शुभ!

Webdunia
लग्न सराईची घाई सुरु झाली की तयारी करणे घरच्यांसाठी एक मोठी परीक्षाच असते. त्यातून सर्व ठरल्यावर मोसम कसा राहील ही काळजी सतत सतावते. लग्नात पाऊस पडला तर घराती आणि वराती दोघांसाठी मुष्किल वाढते. परंतू काही जागी लग्नात पाऊस पडणे शुभ असल्याचे मानले आहेत. याने भाग्य उजळतं आणि यश मिळतं असेही मानले आहे. खरंच लग्नात पाऊस पडणे शुभ आहे का? आपल्यालाही हा प्रश्न असल्यास हे वाचा:
लग्न आपल्या जीवनातील सर्वात सुखाचा दिवस असला पाहिजे. हा दिवस प्रेम, सुख, आशा, उमेद आणि उत्साहाने भरलेला असावा. पाऊस फलदायी असतो कारण याने कोरड पडलेल्या जागांना पाणी मिळतं, चांगलं पिक येतं अर्थातच हे चांगल्या भाग्याचे प्रतीक आहे. हे लक्षात घेता लग्नाच्या दिवशी येणारा पाऊस चांगला नशीब असल्याचे लक्षण आहे. अनेक कारणांमुळे पाऊस चांगल्या भाग्याचे लक्षण दर्शवतं. पाऊस आशीर्वाद, स्वच्छता, एकता आणि एक नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. काही ठिकाणी तर याला कुटुंब वाढवण्याचे प्रतीक मानले आहे.
 
आशीर्वाद आणि समृद्धी
नवीन आविष्य सुरू करताना आशीर्वाद मिळवणे हाच एक मुख्य उद्देश्य असतो. प्रत्येकाला आशीर्वादाची गरज असते. पाऊस आशीर्वाद स्वरूप जीवनात समृद्धी येण्याची आशा जगवतो. लग्न म्हणजे संसाराला नवीन सुरुवात अशात समृद्धी देणारा पाऊस पडणे म्हणजे आशीर्वाद समजावे.

नवीन सुरुवात
पावसानंतर चोहींकडे हिरवागार आणि स्वच्छ दिसायला लागतं. प्रत्येक गोष्ट ताजेतवानी दिसते. तसेच संसार सुरू करत असणार्‍यांना पाऊस एक नव्या सुरुवातीचे सूचक आहे.
 
कुटुंब वाढण्याचे चिन्ह
पाऊस कुटुंब वाढण्याचे संकेत आहे. पाण्याने पिक उगवतं आणि वाढतं. तसेच लग्नानंतर अपत्य प्राप्तीसाठी हे फलदायी आहे. काही लोकांप्रमाणे लग्नात पाऊस आल्याने कुटुंब वाढण्याचे संकेत मिळतात. ही शुभ गोष्ट आहे.
 
भौतिक संपत्ती
भौतिक संपत्तीमध्ये वृद्धी होणे अर्थात भौतिक धन-धान्य प्राप्त होणे. म्हणूनच हे संसाधने, उत्पादकता, आणि चांगले पीक इत्यादीचे प्रतीक आहे.
सर्व पहा

नवीन

चातुर्मास म्हणजे काय? या चार महिन्यांत कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावे?

मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?

मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

श्री वट सावित्री आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments