चिंतामण गणेश मंदिर सुमारे 1200 वर्षे जुने आहे. येथील पुजारी सांगतात की, 22 वर्षांपासून गणेश मंदिरात प्रतिदिन पोस्टमन टपाल घेऊन येतो. त्यात काही पत्र मनोकामना पूर्ण झाल्याचे तर काही समस्या निवारण झाल्याचे आभार मानणारे असतात. परंतु अत्याधुनिक जमण्यातील मानव देखील आधुनिक झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात पत्र हरवले असून कमालीची गोष्ट म्हणजे आता तर चिंतामणी गणरायाला भक्तांचे फोन यायला लागले आहे. जेव्हा मंदिरात भक्तांचा फोन मंदिरात येतो तेव्हा पुजारी तो फोन गणरायाच्या कानाला लावतात व भक्त त्यांच्या मनोकामना अथवा समस्या चिंतामणी गणरायाला सांगतात. चिंतामणी गणेश मंदिरात येणाऱ्या भक्तांचे म्हणणे आहे की, चिंतामण गणेश मोबाईल फोनवरून अथवा पत्रांच्या माध्यमातून मनोकामना व समस्यांचे निवारण करतात.
चिंतामणी गणरायाला येणारे फोन हे केवळ भारतातूनच नाही तर विदेशातून ही येतात. ज्या भक्तांची मनोकामना मोठी असते. त्यांना पत्राद्वारे सविस्तर उत्तर पाठविले जाते. भक्तांना विश्वास आहे की, या माध्यमातून त्यांच्या इच्छा श्री गणेश पूर्ण करतात.
आपला यावर विश्वास बसत असो अथवा नसो मात्र हो सत्य आहे की, चिंतामण गणेश भक्तांच्या समस्या फोनद्वारे जाणून घेतात व त्यांना उत्तर पाठवतात. तसे पाहिले तर भारतात श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील रेषा इतकी अस्पष्ट झाली आहे की, ती नागरिकांना दिसतच नाही. आता आपल्याच ठरवायचे आहे की, चिंतामण गणेश मोबाईल फोनवरून भक्तांची मनोकामना पूर्ण करत असेल आम्हाला जरूर कळवा....