Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MDH आणि Evrest च्या मसाल्यांवर मोठे संकट? सिंगापुर आणि हॉन्गकॉन्ग नंतर US मध्ये तपासणी सुरु

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2024 (12:28 IST)
प्रसिद्ध भारतीय मसाले कंपंनीच्या विरोधात आता यूएस ने पाऊल उचललेले आहे. सिंगापूर आणि हॉन्गकॉन्ग नंतर आता यूएस ने एफडीएला या मसाल्यांची गुणवत्ता तपासण्याचे आदेश दिले आहे. एमडीएच आणि एवरेस्ट विरुद्ध सिंगापूर आणि हॉन्गकॉन्ग ने कारवाई केली होती. सांगितले गेले होते की, या मसाल्यांमध्ये कॅन्सर निर्माण करणारे कीटकनाशक मिक्स केले गेले होते. त्यानंतर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने देशभरातून या मसाल्यांचे सँपल घेण्याचे आदेश दिले होते. पण आता प्रकरण खोलात जात आहे. 
 
आत यूएसचे फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन एफडीएने केमिकलचा पत्ता लावण्यासाठी आपली कार्यवाही सुरु केली आहे. हॉन्गकॉन्गने पहिले मद्रास करी पावडर, करी पावडर आणि सांभार मसाला पावडर सोबत एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्याची विक्री बंद केली होती. तपासणी दरम्यान यामध्ये एथिलीन ऑक्साइड मिळाले आहे. जे कॅन्सरचे कारक आहे. या केमिकलचा उपयोग कृषी उत्पादक कीटकनाशकसाठी वापरतात. त्यानंतर सिंगापूर मध्ये देखील कारवाई केली गेली. 
 
रिपोर्ट अनुसार अमेरिका एजन्सीच्या वतीने सांगितले गेले की, ती मसाल्यांमधील केमिकलची तपासणी करीत आहे. याबद्दल अधिक माहिती मिळवली जात आहे. तसेच भारताच्या जवळील देश मालदीव कडून या दोघी कंपन्यांवर प्रतिबंध लावण्यात ओले आहे. मालदीवच्या फूड अँड ड्रग अथॉरिटी कडून हे आदेश देण्यात आले आहे. 
 
दोन्ही भारतीय कंपन्यांनी आरोप नाकारले. भारतीय एवरेस्ट मसाला कंपनी म्हणाली की, आमचे मसाले सुरक्षित आहे. हे वापरू शकतात. यांच्या उत्पादनाची निर्यात भारतीय मसाला बोर्डच्या लॅब ने मंजुरी दिल्यानंतर करण्यात आले आहे. त्यानंतर या मसाल्यांना बाजारात नेण्यात आले आहे. एमडीएच ने देखील आरोप नाकारले आहे. या विरुद्ध काही पुरावे नाहीत. अजून हॉन्गकॉन्ग आणि सिंगापूरया अधिकऱ्यांशी एमडीएचचे बोलणे झाले नाही. त्यांची कंपनी सर्व घरगुती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व सुरक्षतेचे पालन करीत आहे. या लोकांना आपल्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments