Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सात दिवसात पॅनला आधाराशी लिंक करा नाहीतर दंड द्यावा लागेल

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (13:18 IST)
सरकारने पॅनला आधाराशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची वेळ दिली आहे. या तारेखपर्यंत आपण लिंक केले नाही तर 1,000 रुपये दंड भोगावा लागेल. हे आयकर कायदा 1961 मध्ये जोडलेल्या कलम 234 एचमुळे आहे. ज्याला सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर वित्त विधेयक 2021 अंतर्गत पास केले होते.
 
सरकारद्वारे उचलेल्या या पाऊलामुळे अंतिम तारेखपर्यंत पॅनला आधारशी लिंक न केल्यास जास्तीत जास्त एक हजार रुपये दंड भरावा लागेल. सध्या पॅनशी आधार जोडण्याची शेवटची तारीख चालू आर्थिक वर्षाची शेवटची तारीख आहे म्हणजे 31 मार्च 2021 ही आहे.
 
पॅन होईल निष्क्रिय
जर व्यक्ती शेवटल्या तारेखपर्यंत पॅनला आधार लिंक करत नसल्यास पॅन होईल. अर्थात निश्चित तारखेनंतर पॅनचा आर्थिक व्यवहारात वापर केला जाणार नाही. म्हणजेच जेथे जेथे पॅन आवश्यक असेल तेथे तो वापरला जाणार नाही. याचा परिणाम सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर, म्युच्युअल फंड, डिमॅट खाती उघडणे, नवीन बँक खाती उघडणे यावर होईल.
 
कर तज्ञांच्या मते, वित्त विभाग 2021 मध्ये नवीन विभाग 234 एच जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने आपला पॅन 31 मार्च 2021 पर्यंत आधारशी जोडला नसेल तर त्यानंतर जेव्हा याला लिंक करण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा त्याला 1000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच व्यक्तीला आय स्रोतावर कपात (टीडीएस) चे अधिक भुगतान करावं लागेल. आयकर नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पॅनचा तपशील दिलेला नाही तर बँका किंवा अन्य संस्था अधिक कर वजा करु शकतात. नियोक्ता आपल्या उत्पन्नावर 20% दराने टीडीएस वजा करेल.
 
अनेकदा वाढली आहे तारीख
आतापर्यंत सरकारने पॅनशी आधार जोडण्याची तारीख अनेक वेळा वाढविली आहे. अशात जर आपण पॅनला आधारशी लिंक केले नसेल तर आपण आपल्या पंजीकृत मोबाइल नंबरवरून मेसेज पाठवून लिंक करावे. किंवा आपण आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईनही अप्लाय करु शकता. आपण आपला पॅन आधार ऑफलाइन देखील लिंक करु शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments