Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sanchi Milk Price hike : अमूल आणि मदर डेअरीनंतर सांचीचे दूधही 2 रुपयांनी महागले

Webdunia
मंगळवार, 6 मे 2025 (17:12 IST)
Sanchi Milk Price hike :   सामान्य माणसाला पुन्हा महागाईचा मोठा फटका बसला आहे. मदर डेअरी आणि अमूल मिल्कनंतर सांचीनेही दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. सांची दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कच्च्या दुधाच्या खरेदी किमतीत वाढ, पशुखाद्याच्या किमतीत वाढ आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे किमती वाढवल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी आणि गुणवत्ता राखण्यासाठी हे पाऊल घेणे आवश्यक  होते.
ALSO READ: मदर डेअरीचे दूध महागले, प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ
अमूल आणि मदर डेअरीने किमती वाढवल्या होत्या
याआधी अमूल आणि मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले ​​आहेत. मदर डेअरीने ही दरवाढ सुरू केली होती. सर्वप्रथम, मदर डेअरीने 30 एप्रिलपासून दुधाचे दर वाढवले ​​होते. त्यांनी दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढही केली. मदर डेअरीने दुधाच्या किमती वाढण्यामागे कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचे कारण असल्याचेही सांगितले होते. या कारणांमुळे अमूलने दुधाच्या किमतीत वाढ केली होती.
ALSO READ: WAVES 2025 मध्ये म्हणाले मुकेश अंबानी, पुढील दशकात भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग १०० अब्ज डॉलर्सचा होईल
किमतीत किती वाढ झाली ?
भोपाळ सहकारी दूध संघाच्या म्हणण्यानुसार, आता 1 लिटर फुल क्रीम गोल्ड मिल्क साठी  67 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दर 7 मे पासून लागू होतील. फुल क्रीम मिल्क (सोने) 500 मिलीसाठी 33 रुपयांवरून 34 रुपये किमती झाल्या आहे. स्टँडर्ड मिल्क (शक्ती) आता 500 मिलीसाठी 31रुपयांनी विकले जात आहे,
ALSO READ: १ मे पासून ATM चे नियम बदलत आहेत, पैसे काढण्यापासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत, या गोष्टी महागणार...
जो पूर्वी 30 रुपयांनी विकले जात होते. टोन्ड मिल्क (स्मार्ट) आता 500 मिलीसाठी 28 रुपयांनी विकला जात आहे, जो पूर्वी 27 रुपयांनी विकला जात होता. डबल टोन्ड मिल्क (स्मार्ट) आता 500 मिलसाठी 25 रुपयांनी विकला जात होता, जो आता 26 रुपयांनी विकला जात आहे. चहा आणि दूध आता 60 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल, जे पूर्वी 58 रुपये होते.
Edited By - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments