Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमूल दुधाचे दर वाढले, 1 जुलैपासून नवीन किंमत लागू

Amul Milk Price Hiked
, बुधवार, 30 जून 2021 (15:39 IST)
एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, दुसरीकडे वेळोवेळी महागाई देखील भारतातील सर्वसामान्यांना धक्का देत आहे. आता अमूल दुधाच्या किंमती वाढल्या आहेत, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. अमूल मिल्क कंपनीने प्रतिलिटर 2 रुपये वाढ केली आहे. होय, म्हणायला फक्त 2 रुपये वाटत असले तरी सामान्य माणसाच्या खिशाला भर फटका भसणार.
 
दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने चहा, कॉफी, मिठाई यासह तूप, पनीर, चीज, लस्सी आणि ताक या वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते यात शंका नाही. दूध ही प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असते, याचा अर्थ सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात त्याचा मोठा परिणाम होईल.
 
माहितीसाठी आपणस सांगू इच्छितो की अमूलची सर्व दुधाची उत्पादने जसे की अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताझा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम आणि ट्रिममध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली जाईल.
 
एवढेच नव्हे तर ब्रिटानिया, पतंजली, आनंद यासारख्या बर्‍याच कंपन्या यामधून दूध व तेथील पदार्थांची विक्री करतात. अशा परिस्थितीत, या सर्व कंपन्या अमूल दुधाच्या वाढीनंतर किंमती वाढवू शकतात.
 
1 जुलैपासून अमूल दूध दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात महागड्या दराने मिळणार आहे. दीड वर्षानंतर अमूलने किंमती वाढवल्या आहेत. नव्या किंमतींप्रमाणे आता अमूल गोल्डचे दर लिटरमागे 58 रुपये असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा अध्यक्षाची निवड पावसाळी अधिवेशनातच होईल : थोरात