Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!
, रविवार, 19 मे 2024 (12:42 IST)
बाबा रामदेव पुन्हा अडचणीत सापडले असून पतंजलीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता  चाचणीत फेल झाली आहे.या प्रकरणी कारवाई करत, उत्तराखंडच्या पिथौरागढच्या पोलिसांनी  तिघांना अटक केली असून या मध्ये पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
 
तिघांनाही सहा महिन्यांची शिक्षा आणि दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या कलम 59 अंतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापकाला 50 हजार रुपये तर अन्य दोन दोषींना 10 आणि 25 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
 
वृत्तानुसार, 17 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने उत्तराखंडमधील पिथौरागढ बेरीनाग मार्केटला भेट दिली. यावेळी बेरीनाग मार्केटमध्ये असलेल्या लीलाधर पाठक यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला.
 
सोन पापडीचे नमुने घेऊन रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. तसेच रामनगर कान्हा जी आणि पतंजली या पुरवठादारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
 
तपासणीत मिठाईचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. चाचणीत नापास झाल्याने पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली असून तिघांविरुद्धची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काल त्यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या