Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भैरवनाथ शुगरकडून उसाला 2511 रुपे प्रतिटन दर जाहीर

Bhairavnath Sugar announces a sugarcane price of Rs. 2511 per ton
पोथरे , शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:22 IST)
तालु्रातील ऊस  उत्पादक शेतकर्‍यांचा एकमेव आधारस्तंभ असलेल्या विहाळच्या भैरवनाथ शुगर चालू वर्षीचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करणार आहे. त्याकरिता कारखान्यास ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिटन 2511 रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, कार्यकारी संचालक किरण सावंत, विहाळचे
संरपच काशीनाथ भुजबळ तसेच अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सावंत म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उद्‌भलेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे यावर्षी सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाला आहे. यामुळे ऊस तोडणी मजूर मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील साखर कारखान्याकडे वळाल्याने ऊसतोडणी मजुरा अभावी अनेक कारखान्यांचे काम ठप्प आहे.
 
कारखान्याचे संस्थापक आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार या वर्षीचा गाळप हंगाम आपण पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी चाचणी हंगामापासून ठेवलेल्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे आजवरचे सर्वच हंगाम यशस्वीपणे पार पडलेले आहेत.
त्यामुळे यावर्षीचा गळीत हंगाम ही कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप पूर्ण केल्याशिवाय
बंद केला जाणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिस्त्री यांचे सुप्रीम कोर्टात कॅव्हेट?