Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका, व्याजदरात कपात

छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका, व्याजदरात कपात
, शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:39 IST)
केंद्र सरकारने छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका दिला आहे. यात भविष्य निर्वाह निधीसह अन्य छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान विकास पत्र आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांचा समावेश आहे.

एक जानेवारी ते 31 मार्च दरम्यान या योजनांमधील व्याजदरात कपात केली जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमधील व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तसेच सेव्हिंग डिपॉझिटमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

अल्प बचत योजनांवरील व्याजदारात अर्थ मंत्रालयाने जरी कपात केली असली, तरीही बँकांच्या तुलनेत या अल्प बचत योजनांवरील व्याजदर अधिकच आहेत. अनेक बँकांमध्ये बचत खात्यावरील व्याजदर 3.5 टक्के करण्यात आले असताना, अल्प बचत योजनांवरील व्याजदर 4 टक्के आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्ष 2018 : 12 महिने, 12 संकल्प