तेल क्षेत्रांतून उत्खनन कमी झाल्यामुळे जुलै महिन्यात देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन घटले आहे. सरकारी कंपनी ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने पश्चिम तेल उत्खनन क्षेत्रातून कच्च्या खनिज तेलाचे 1.7 टक्के कमी उत्पादन घेतले आहे; तर सोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी उत्खनन कमी केल्यामुळे जुलैमध्ये भारताचे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन 3.8 टक्क्यांनी घटले आहे, अशी सरकारी आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली.
ओएनजीसी आणि खासगी तेल कंपन्यांकडून तेलाचे उत्खनन कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील उत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन 3.8 टक्के घटले आहे.
ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. कच्च्या खनिज तेलाचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचे उत्पादन घेतले जाते, ते जुलैमध्ये 2.45 दशलक्ष टनांपर्यंत घटले आहे, जे मागील वर्षी 2.54 दशलक्ष टन होते.