Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोट बंदीने लहान व्यवसायिकांना मोठा फटका, अजूनही अडचणी कायम

Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी अर्थात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या आणि एका मोठ्या नाट्याला सुरवात झाली. यामध्ये अजूनतरी संमिश्र असे परिणाम दिसून आले आहेत. मात्र नोटबंदी यशस्वी झाली असे पूर्ण पणे म्हणता येणार नाही. कारण या बंदीचा मोठा परिणाम बाजारात दिसून आला आहे. यामध्ये रोज रोखीने होणारे सर्व व्यवहार त्यांना मोठा फटका पडला आहे. नोटबंदी झाली आणि रोजच्या व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. यामध्ये घराजवळील वाणी असो वा भाजीपाला विक्रेता यांच्या सोबत होत असलेल रोखीचे व्यवहार अचानक कमी झाले परिणामी व्यवसायावर मोठा फटका बसला तर घरातील गृहिणीला सुद्धा याचा फटका बसला आहे.
 
नोट बंदी करतांना देशातील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन करायचे असा सुद्धा सरकारचा प्रयत्न होता. आता एक वर्ष झाले तेव्हा मागे वळून पाहतांना या प्रयत्नाला म्हणवे तसे यश मिळालेले मुळीच दिसत नाहीत. हा प्रयत्न फासण्या मागे लोकांची अद्यापही मान्सिकता बदलेली मुळीच दिसत नाही. बँकेत जावून रांगेत उभे राहून स्लीप भरून पैसे जमा होतात हाच विचार अजून पक्का आहे. अनेक गावात दुकानाचा मालक पैसे रोखीने जमा करतो, कार्ड दाखवले पैसे असतील तर या कार्ड नको असे स्पष्ट सांगतो.सरकार ऑनलाईन पेमेंट करतांना लोकांच्या मनात आवश्यक व्यवहारी विश्वास निर्माण करण्यात सफशेल अपयशी ठरले आहे. तर बँकेतील कार्ड ने पेमेंट करतात बँक पैसे कापतात त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.
 
लहान व्यवसायिकाना मोठा आर्थिक फटका :
नोट बंदीचा फटका लहान व्यवसाय करणारे होते त्यांना मोठा बसला आहे. बाजारात चलन तुटवडा निर्माण झाला आणि त्यांना यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात उदाहरण जर आपण घेतले तर चहा विक्रेते यांचे बघूया. आपल्या देशात चहा विक्री करणारे अनेक लहान व्यवसायीक आहेत जे की आपली रोजचे पैसे यातून कमावतात. यामध्ये सर्वात महत्वाचे असे की एकतर उधारीत किंवा दर रोज पैसे देऊन ग्राहक चहा पीत असतो. मात्र जेव्हा नोट बंदी झाली आणि चलन तुटवडा झाला तेव्हा अचानक चहा विक्री कमी झाली परिणामी उत्पन्न कमी झाले त्यामुळे अनेकांना रोजचे उत्पान्न मिळाले नाही त्यामुळे मोठा आर्थिक परिणाम झाला. उत्पन्न कमी म्हणून या व्यवसायाला लागणारे कच्चा माल सुद्धा कमी विकत घेतला गेला, म्हणजेच यावर अवलंबून असणारी सर्व व्यवसायांवर परिणाम झाला आहे.  
 
“यामध्ये नोटबंदी मुळे सर्वात मोठा फटका आधी औद्योगिक परिसराला बसला आहे. यामध्ये अनेक छोटे व्यवसायिक आहेत. ज्यांना रोजचे व्यवहार करणे फार अवघड होवून बसले, हे कमी होते की काय की लगेच जी एस टी लावला गेला त्यामू तर अजून अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये लघु, मध्यम जे व्यवसाय असतात कारखाने असतात त्यांना तर मोठा फटका बसला आहे. जरी हा फटका मी उदाहरण म्हणून नाशिकचे देत असलो तरीही हे पूर्ण राज्य आणि देशात अशीच परिस्थिती आहे.” असे मत नाशिक इंडूस्ट्रीज मॅन्यूफ्रकचर असोसिएशन (निमा ) अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी मत व्यक्त केले आहे.
 
जेव्हा VAT कर प्रणाली लागू केली होती तेव्हा सुद्धा मोठा परिणाम दिसला मात्र नंतर ते सुद्धा सुधारले होते. मात्र आता जी एस टी मध्ये सुद्धा सुधारणा होतील असे दिसायला हवे असे पाटणकर बोलतात.
 
“आपण उदाहरण पाहू की जेथे उद्योग धंदे थोडे माग पडले आहेत. तेथे अनेक व्यवसायिकांना फटका बसला आहे. जसे की आपण पाहू की अनेक चहा विक्रेते व्यवसाय करतात. त्यांना GST नोंद नाही. मात्र जे त्यांच्या सोबत व्यवहार करतात त्यांना मात्र GST नोंद करणे गरजेचे आहे. कारण त्यांना सरकारला सांगावे लागते की त्यांनी माल कोणाला विकला ज्याला माल विकला त्याची नोंद नाही कारण सरकार म्हणते २० लाख रुपये उलाढाल नाही त्यांना नोंद गरजेची नाही. मग मला सांगा याचा फटका बसणार की नाही .”
 
उद्योग क्षेत्रात जे लघु आणि मध्यम कारखानेआहेत त्यांनी आपले व्यवसाय एकतर विकले, बंद केले किंवा ते जे तयार करत होते त्याचे उत्पादन ५० % कमी केले आहे. सरकारचे असे बदलते धोरण आणि परिणाम न पाहता निर्णय घेणे यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. असे पाटणकर स्पष्ट करत.
 
यामध्ये पुन्हा एक मोठा फटका समोर येतो ते नवीन व्यवसाय नोंद होय. यामध्ये जिल्हा रोजगार भवन येथे जिल्हा उद्योग केंद्र आहे या ठिकाणी नवीन व्यवसाय नोंद होते. मात्र येथील प्रमुख य. स. दंडगव्हाल सांगतात की आता तर जी पूर्वी गर्दी होत असे अशी कोणतीही गर्दी आजकाल होत नाही. कोणी तरी फक्त विचारणा करतात मात्र फार कमी व्यवसायिक आहेत जे नवीन धंदा नोंदणी साठी येत नाही याचा जवळपास १३ टक्के असा फटका बसला असे समोरयेत आहे.
 
गृहिणी झाल्या लक्ष :
प्रत्येक घरातील गृहिणींचा एक छुपा बटवा, पर्स अथवा डबा असतोच नोट बंदी काळात याच डब्यातील पैश्यानी अनेकांना तारले होते. मात्र आता हाच डबा लक्ष बनला आहे. दुसरी कडे ऑनलाईन व्यवहार करण्या साठी अनेकदा महिलांचा विश्वास कमी पडत आहे. त्यामुळे महिलांची छुपी बचत कमी नक्कीच झाली आहे. नोटबंदी काळात महिला वर्गाने घरात अडचणी मध्ये जमा केलेले ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटा अचानक समोर आल्या आणि त्यांना त्या जमा कराव्या लागल्या त्यामुळ आता महिला वर्ग आता बचतीला धजावत नाही. तर बँकेत प्रत्येक व्यवहारावर अनेक बंधने आणि कर आकारणी यामुळे सुद्धा आता अडचणी निर्माण झाल्या आहे. यामध्ये ज्या गरीब घरातील महिला थोडे पैसे कमवतात त्यांना रोज बँकेत पैसे टाकणे जमत नाही. त्यामुळे सुद्धा बचत फार कमी झाली आहे. पूर्वी या बचतीतून महिला घरातील आर्थिक अडचण दूर करत होत्या.
 
गृहिणी मेघा वैद्य सांगतात की “आधी आम्ही रोज नवऱ्या कडून मिळत असलेल्या पैश्यातून काहीना काही पैसे वाचवत होतो. नोट बंदीच्या काळात माझे साठवलेले जाव्पापास १० हाजार रुपयांवर घर चालेल होते. तर काही नोटा जमा कारव्या लागल्या होत्या.मात्र हे करतात आता माझ्या कडची बचत संपली आहे. आता हेच पैसे पुन्हा जमवताना बरेच दिवस जावे लागणार आहे. सोबत माझी ही बचत घरात उघड झाली आहे.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मुंबईत फसवणुकीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश, 19 जणांना अटक

पोलिस स्टेशनचा प्रमुख सांगून कॉलर म्हणाला- दोन एसी पाठवा, खाकीच्या नावावर अशी फसवणूक

रेल्वे स्थानकावर मोठा बॉम्बस्फोट, 24 जण मृत्युमुखी

नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर समाज तोडल्याचा आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान मोदींचा अकोल्यात काँग्रेसवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments