Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Foxconn: फॉक्सकॉनची भारतात नवीन योजना, 4100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (23:44 IST)
अॅपल बनवणारी तैवानची कंपनी फॉक्सकॉन लवकरच भारतात दोन कारखाने सुरू करणार आहे. एका अहवालानुसार, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप भारतातील दोन कारखान्यांसाठी एकूण $500 दशलक्ष म्हणजेच 4100 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतो. या दोन्ही कारखान्यांसाठी दक्षिणेकडील कर्नाटक राज्याची निवड करण्यात आली आहे. 
 
या दोन कारखान्यांपैकी एका कारखान्याचा वापर अॅपलचे आयफोन बनवण्यासाठी केला जाणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये फॉक्सकॉनच्या उपकंपनीने कर्नाटकमध्ये एकूण $972.88 दशलक्ष म्हणजेच 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. एवढेच नाही तर कंपनीने आणखी दोन दक्षिणेकडील राज्य तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही मोठी गुंतवणूक केली आहे.
 
कर्नाटकात योजनेवर लक्ष दिले जात असून या आठवड्यात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू नंतर फॉक्सकॉन उपक्रमांचे स्वागत करणारे कर्नाटक हे तिसरे दक्षिण भारताचे राज्य ठरले. तथापि, अद्याप फॉक्सकॉन आणि ऍपलने या प्रकरणावर कोणतेही विधान जारी केलेले नाही.
 
भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे कंपनी लवकरच आपला सर्व व्यवसाय चीनमधून भारतात आणण्याचा विचार करत असल्याचे मानले जात आहे. तैवानच्या कंपनीने तामिळनाडूशी एक महत्त्वाचा करार केला आहे, ज्यामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन कारखाना उभारण्यासाठी 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे 
 
हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास स्थानिक लोकांसाठी सुमारे 6,000 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. एका अहवालानुसार, फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) चे सीईओ ब्रँड चेंग आणि अनेक कंपनी प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत दक्षिणेकडील राज्यातील संभाव्य गुंतवणूक संधींवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
 
फॉक्सकॉनने तामिळनाडूमधील प्रस्तावित योजनेसाठी $180 दशलक्ष ते $200 दशलक्ष गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारमधील एका अज्ञात स्त्रोताने सांगितले की FII सुविधा राज्याची राजधानी चेन्नईजवळील कांचीपुरम जिल्ह्यात असेल
 
फॉक्सकॉन चे अध्यक्ष यांग लियू यांनी कर्नाटकातील बेंगळुरूची भेट दिली असून त्याची राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. 
फॉक्सकॉन 2019 पासून भारतात अॅपल हँडसेट तयार करत आहे. फॉक्सकॉन व्यतिरिक्त, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन देखील भारतात Apple उपकरणे तयार करतात.
 





Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवणारी माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस शिवसेना कडून जाहीर

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments