सलग तिसऱ्या दिवशी आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर 3,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. काल सोन्याचा भाव मोठ्या घसरणीनंतर हिरव्या रंगावर आला होता, पण आज पुन्हा सकाळच्या व्यवहारात दरात प्रति 10 ग्रॅम 560 रुपयांची घसरण दिसून येत आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्राम ची किंमत 96 हजार 700 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचे दर 88,500 आहे. आज बुधवारी 14 मे रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या चांदीचे दर जाणून घेऊ या.
दिल्लीत सोन्याचे 22 कॅरेट चे दर 88,710 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 96,760 रुपये प्रति 10 ग्रामचे आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 88,500 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 96,060 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचे दर 88,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 96,060 रुपये आहे
कोलकाता मध्ये 22 कॅरेट सोन्याचे 88,050 आणि 96,060 रुपये आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण होण्याचे मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन मधील तणाव कमी होणे आहे. अमेरिकेने चीन मधून येणाऱ्या वस्तूंवरील कर वाढवण्याची योजना पुढे ढकलली आहे. या कारणामुळे बाजारपेठांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेअरबाजारातील वाढीमुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतींवर दबाब वाढला असल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले.
बुधवारी 14 मे 2025 रोजी चांदीचे भाव 97,900 रुपये प्रति किलो असून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.