Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जीएसटीसाठी ७ मे ऐवजी २०, २१ आणि २२ ला विशेष अधिवेशन

जीएसटीसाठी ७ मे ऐवजी २०, २१ आणि २२ ला विशेष अधिवेशन
, मंगळवार, 2 मे 2017 (16:33 IST)

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन नियोजित केले आहे. १७ मे रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता १७ मे ऐवजी २०२१ आणि २२  मे रोजी होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. १८ आणि १९ मे रोजी श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे. कोणत्या वस्तू कर रचनेत येतील याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. राज्याचा अर्थ मंत्री म्हणून तेथे उपस्थित राहणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

H1B प्रभाव: इंफोसिस 10,000 अमेरिकांना देईल नोकरी