Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगल लवकरच डेबिट कार्ड लॉन्च करणार

Google to be launched debit card
, सोमवार, 20 एप्रिल 2020 (22:12 IST)
गुगल लवकरच आपले डेबिट कार्ड लॉन्च करणार आहे. ज्याद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा मिळू शकतात. यासाठी गुगलने बऱ्याच बँकांसोबत बोलणं देखील केलं आहे.
 
जगभरात गूगल पेच्या यशानंतर कंपनीने व्हर्च्युअल आणि फिजीकल स्मार्ट डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना तयार केली आहे. गुगलच्या या डेबिट कार्डच्या मदतीने ग्राहकांना ऑनलाईन व्यतिरिक्त किरकोळ दुकानातून वस्तू खरेदी करता येणार आहेत. हे डेबिट कार्ड Google अॅपशी कनेक्ट केले जाईल, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती त्यांच्या खरेदीवर सहज नजर ठेवू शकते, बँक बॅलन्स किंवा लॉक खाते शोधू शकते.
 
गुगल ज्या बँकांद्वारे हे कार्ड लॉन्च करणार आहे त्यात सिटीबँक आणि स्टॅनफोर्ड फेडरल क्रेडिट युनियनचा समावेश आहे. या कार्डबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती स्मार्टफोनमध्ये देखील वापरली जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच