करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन काळ 3 मे पर्यंत वाढवला. या दरम्यान टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही घोषणा केली गेली असून 15 एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जारी केली होती. यात ऑनलाइन शॉपिंग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती परंतू आता केंद्रानं यू टर्न घेतला आहे. आता केवळ जीवनाश्यक वस्तु आणि औषधांचीच विक्री करता येईल.
पूर्वी सर्व ई-कॉमर्स कंपन्या सर्व साहित्याची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. 15 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आदेशात 20 एप्रिलापासून ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. यात सर्वच वस्तूंचा समावेश होता.
परंतू 20 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ई-कॉमर्स सेवांबाबतच्या नियमात केंद्रीय गृह मंत्रालयानं एक दिवस आधी बदल केला आहे. आता केवळ जीवनाश्यक वस्तु आणि औषधांचीच विक्री करता येईल.