Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परत एकदा ग्रेट इंडियन सेल, एचडीएफसी ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक

goeat indian sell hdfc bank
, सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:10 IST)

ऑनलाईन खरेदी विश्वातील मातब्बर कंपनीने परत एकदा ग्रेट इंडियन सेल जाहीर केला आहे. एक कोटी 60 लाख उत्पादनावर सूट दिली जाणार आहे. हा सेल 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2018 या दरम्यान असणार आहे. या सेल दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रॅँडेड उत्पादनांवर प्रचंड सूट मिळणार आहे. यात अॅपल, वनप्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रॅँगलर, टायटन, अमेरिकन टुरिस्टर, बीपीएल, मायक्रोमॅक्स, टिसीएल, लेनोवा, एचपी, एलजी, बजाज, उषा यासारख्या असंख्य ब्रॅँड्सचा समावेश आहे.

जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील 200 रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेनेही विशेष सुविधा देऊ केली आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अॅमेझॉनच्या सवलतीव्यतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे. जे ग्राहक एचडीएफसीचं क्रेडीट आणि डेबिट कार्डचा वापर करून इएमआयवर वस्तू घेतील त्यांना ही सुविधा दिली जाईल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा वाद मिटला