इंडिगोने चार दिवस स्पेशल 'व्हॅलेंटाईन डे' ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तिकिटांची किंमत अवघी 999 रुपयांपासून सुरू होत आहे. या तिकिटांद्वारे देशभरात कुठेही प्रवास करता येणार आहे. कंपनीने जाहिर केलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे. 10 लाख जागांकरता ही तिकिटं विकली जाणार आहे. या तिकिटांवर 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कधीही प्रवास करू शकतात.
इंडिगोच्या सेलमध्ये कॅशबॅकचा फायदा
1. इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्फत EMI वर तिकिट बुक करता येणार आहे. 12% म्हणजे 5 हजार रुपये अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.
2. HDFC बँकेच्या PayZapp मधून तिकिट बुकिंग करू शकता. यावर 15%कॅशबॅक मिळणार आहे. ज्यामध्ये 1000 रुपये ते 4000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
3. फेडरल बँकेच्या डेबिट कार्डमार्फत तिकिट बुकिंग केल्यावर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांचा 1500 ते 10 हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे.