दैनंदिन वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचाही सामना करावा लागत आहे. आता देशातील महागाईचा परिणाम दुधाच्या दरावरही दिसणार आहे. डेअरी कंपन्या लवकरच दर वाढवू शकतात.अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर तसेच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ञांनी शुक्रवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डेअरी प्रॉडक्टच्या किंमती वाढू शकतात.
तज्ञ म्हणतात, सर्व डेअरी कंपन्या किंमती 5% ते 8% पर्यंत वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. आम्ही अपेक्षा करतो की सर्व डेअरी कंपन्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवतील.”
घरा सोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उघडल्यामुळे दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे, असे विश्लेषकांनी सांगितले. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात झालेली वाढ आणि उष्णतेमुळे घटलेले दुधाचे उत्पादन याचाही भावावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी घाऊक दुधाचे दर वर्षानुवर्षे वाढतच आहेत