सध्या सर्वत्र मंदीचे सावट दिसत आहे. मंदीच्या भीतीने जगभरातील कंपन्यांमध्ये कपातीची प्रक्रिया सुरु असून आता आयटी क्षेत्रातील एक्सेंचर कंपनी देखील तब्बल 19 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. या शिवाय कंपनीने वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाज कमी केला आहे. मंदीमुळे कंपनीने असे केल्याचे मान्य केले.
मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन आणि मेटा (एक्सेंचर)नेही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ही संख्या त्याच्या कर्मचाऱ्यांच्या 2.5 टक्के आहे.
"आम्ही आर्थिक वर्ष 2024 आणि त्यापुढील खर्च कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत आणि लक्षणीय वाढीच्या संधींचा लाभ घेणे सुरू ठेवू,"असे एक्सेंचर च्या सीईओने सांगितले.
एक्सेंचरचे जगभरात 738,000 कर्मचारी आहेत. 49 देशांतील 200 हून अधिक शहरांमध्ये त्याची कार्यालये आहेत. ही आयरिश-अमेरिकन कंपनी आहे जी IT सेवा आणि सल्लामसलत मध्ये विशेष आहे.