आधीच अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजला अजून एक धक्का बसला आहे. जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पदत्याग केला.
जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यांच्या आधी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यासोबतच कंपनीचे सचिव कुलदीप शर्मांनीही जेट एअरवेज सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातली दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी विमानसेवा असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली ही कंपनी दबलेली आहे.