Dharma Sangrah
✕

जेट एअरवेजची सेवा बंद

Webdunia
गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:27 IST)
जेट एअरवेजने बुधवारी मध्यरात्रीपासून आपली सेवा बंद केली आहे. मध्यरात्रीनंतर जेट एअरवेजची सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित झाली आहेत. जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प होणार आहे. गेल्या डिसेंबरपासून जेट एअरवेजच्या विमानांच्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली होती. 
 
जेटच्या १२३ विमानांच्या ताफ्यापैकी केवळ पाचच विमाने कार्यरत होती. याशिवाय, जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच ठप्प झाली आहेत. कंपनीत स्टेट बँकेने हिस्सा वाढविताना, १,५०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचे जाहीर केल्यापासून मात्र प्रत्यक्षात ३०० कोटींचाच वित्तपुरवठा झाल्याने जेटची देशांतर्गत उड्डाणांची संख्या दिवसागणिक कमी होत आली आहे. सुरुवातीला पूर्वेत्तर भारत तर नंतरच्या टप्प्यात दक्षिणेतील उड्डाणे कमी करण्यात आली होती. मध्यंतरी देणी थकल्याबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जेटचा तीन वेळा इंधनपुरवठाही खंडित केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

भारताने दुसरा सामना नऊ गडी राखून जिंकला

महायुतीत अर्थ मंत्रालयावरून वाद; सुनेत्रा पवार यांनी मतभेदांच्या अटकळी फेटाळल्या

LIVE: राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने इंटर मियामीसाठी दमदार कामगिरी केली

पुढील लेख
Show comments