Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Jio चे दोन नवीन प्लॅन

Jio चे दोन नवीन प्लॅन
, सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (22:00 IST)
लिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे (JIO New Recharge Plan) आपल्या युजर्ससाठी विविध किंमतीचे अनेक प्लॅन आहेत. अनेक ग्राहकांना जास्त डेटा देणारे प्लॅन पाहिजे असतात, तर काही ग्राहक अधिक वैधता असलेले प्लॅन्स शोधत असतात. 
 
आम्ही तुम्हाला जिओकडे असलेल्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या दोन प्रीपेड प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 84जीबी डेटा मिळतो. यातील एका प्लॅनमध्ये दररोज 3जीबी डेटा ग्राहकांना मिळतो, तर दुसरा प्लॅन दुप्पट व्हॅलिडिटीसह येतो.
 
रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन :- (JIO New Recharge Plan) 
जिओचा हा दररोज 1.5 जीबी डेटा देणारा प्लॅन आहे. 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे एकूण 84जीबी डेटा ग्राहकांना वापरण्यास मिळतो. याशिवाय कॉलिंगसाठी युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल.
रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन :-(JIO New Recharge Plan) 
जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवस व्हॅलिडिटी मिळेल. पण यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. म्हणजे 28 दिवसांमध्ये एकूण 84 जीबी डेटा ग्राहक वापरु शकतात. यामध्ये युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल.
कोणता प्लॅन सर्वोत्तम – ? (JIO New Recharge Plan) 
जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर तुमच्यासाठी 349 रुपयांचा प्लॅन उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. पण जर डेटासोबतच तुम्हाला वैधताही पाहिजे असेल तर 399 रुपयांचा प्लॅन चांगला पर्याय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्ही मालिका का चालतात? टीआरपी कसा मिळतो?