Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय पथकाची लासलगाव बाजारसमितीत कांदा भावाची परिस्थितीचा आढावा

Webdunia
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (09:24 IST)
संपूर्ण देशात सर्वसधारण बाजारपेठेत कांदा दर ठरवणाऱ्या आणि एशियातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीमध्ये केंद्रीय पथकाने अचानक येऊन पाहणी करत माहिती गोळा केली आहे. यामुळे व्यापारी वर्गात भीती व नाराजी पसरली आहे. बाजार समितीत सोमवारी कांदा भावात २३० रूपयांची घसरण झाली होती त्यात कांदा लिलावात १४०१ ते ४२४७ हा सर्वाधिक भाव मिळला होता. त्याबरोबर सरासरी भाव ३९०० रूपये इतका जाहीर झाला होता. जेव्हा सकाळी बाजारपेठेत सुरु झाली तेव्हा ५१० वाहनातून कांद्याची आवक सुरु झाली, तर मागच्या आढवड्याच्या तुलनेत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ८५० रूपये भावात घसरण पहायला मिळाली आहे. तर मागच्या आठवड्यातील शुक्रवारी ६५३ वाहनातील कांदा आवक झाली आणि १२१२ ते ४५०० रूपये व सरासरी ४१०० रूपये भावाने कांदा विकला गेला होता. कांदा भाव सर्वसाधारण बाजारात वाढत असल्याने केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर साठवण मर्यादा घालणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्या बरोबर व्यापारी घाबरले आहेत. यामध्ये केंद्र सरकारने दोन वरिष्ठ अधिकारी यांच्या पथकाला लासलगावला कांदा दर वाढीबद्दल माहिती घेण्यासाठी पाठवले होते. केंद्राने एका बाजूला कांदा निर्यात मुल्य वाढवुले तर कांदा आयातीचा निर्णय झाला देखील तरीही कांदा भावात तेजी सुरूच आहे. निर्यात परिस्थितीची माहिती, सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे, याबाबतची संपूर्ण माहिती लासलगाव भेटीत अभयकुमार संचालक ग्राहक संरक्षण विभाग, पंकज कुमार सहाय्यक संचालक कृषी आण शेतकरी कल्याण विभाग, आर पी गुप्ता मुख्य सलाहाकर एमआय डीएच, निखिल पठाडे निदेशक नाफेड, शिरीष जमदाडे सहसंचालक फलोत्पादन विभाग पुणे, बहादुर देशमुख विभागीय अधिकारी पणन मंडळ, जी.डी वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी बटु पाटील यांच्या शिष्टमंडळाने बाजार समितीत भेट देऊन भावाची माहिती जाणून घेतली आहे. यामुळे आता सरकार अजून निर्बंध आणून कांदा भाव आवाक्यात आणेल व भाव पडतील अशी भीती व्यापारी वर्गाला आहे. सोबतच साठवणूक करणारे देखील या कारवाईमुळे घाबरले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रः खऱ्या-खोट्याच्या लढाईत अडकले उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे-अजितपवार

Maharashtra Live News Today in Marathi शनिवार 9 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

काँग्रेस जातींना लढविण्याचे काम करत आहे, महाराष्ट्रात गरजले नरेंद्र मोदी

नागपुरमध्ये भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी

आज अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक सभांना पीएम मोदी संबोधित करणार

पुढील लेख
Show comments