Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे लिंबू 400 रुपये किलो, संपूर्ण देशात किमती गगनाला

Lemon price hike
, शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (11:28 IST)
उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असताना लिंबाच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लिंबाचा भाव 300 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी एकच लिंबू 10 रुपयांना मिळत असल्याची परिस्थिती आहे. दिल्लीच्या बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नोएडामध्ये लिंबू 240 ते 280 रुपये प्रतिकिलोपर्यंत वेगवेगळ्या किमतीत विकले जात आहे. मंडईतच लिंबाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे काही दुकानदारांचे म्हणणे आहे, गेल्या आठवड्यात 200 रुपये किलोने विकला जाणारा लिंबू आता 250 रुपये किलोच्या पुढे गेला आहे.

दिल्लीच्या आयएनए मार्केटमध्ये लिंबाचा भाव 350 रुपये किलो आहे, तर नोएडाच्या बाजारात 80 रुपये किमतीचा अडीचशे ग्रॅम लिंबू विकला जात आहे. गाझीपूरच्या भाजी मार्केटमध्ये दुकानदारांना किलोमागे 230 रुपये दिले जात आहेत, त्यानंतर बाजारात ग्राहकांना 280 रुपये किलो भाव मिळत आहे. मात्र, बाजारात दोन प्रकारचे लिंबूही विकले जात आहेत, पहिला हिरवा लिंबू 280 रुपये आणि दुसरा पिवळा लिंबू 360 रुपये किलो दराने विकला जात आहे.
 
राजस्थानमध्ये लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बाजारात 400 रुपये किलो दराने लिंबू विकले जात आहेत. दुकानांमध्ये एक ग्लास लिंबूपाणी 20 रुपयांना विकली जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत लिंबाचा भाव किलोमागे 350 रुपये होता.
 
याचे सर्वात मोठे कारण डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किमती असल्याचे मानले जात आहे. वाहतूक खर्चात वाढ आणि मंडईतील आवक घटल्याने लिंबाच्या दरात वाढ होत आहे.
 
लिंबू व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. लिंबू शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी ठेवते. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबाचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Video 5 सेकंदात मारल्या 5 थप्पड, एसीपीने रोड रोमियोला धडा शिकवला