Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LPG Cylinder New Prices: एलपीजी गॅस सिलेंडर 43.5 रुपयांनी महाग झाला, येथे नवीन दर तपासा

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (10:10 IST)
देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

आजपासून नवीन महिना सुरू होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी महागाईचा मोठा दणका बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो कमर्शियल  गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
 
 तेल कंपन्यांनी सामान्य माणसाच्या वापरण्याच्या 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केल्या नाहीत.त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपये आहे. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती.
विनाअनुदानित 14.2 किलो सिलिंडरची किंमत दिल्लीत बदल न करता 884.50 रुपये, कोलकातामध्ये 911 रुपये, मुंबईत 884.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 900.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.
 
सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलो कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्वाधिक वाढ दिल्लीत 43.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दिल्लीत 19 किलो कमर्शियल गॅसची किंमत 43.5 रुपयांनी वाढून 1736.5 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 35 रुपयांनी वाढून 1805.5 रुपये झाली. मुंबईत किंमत 35.5 रुपयांनी वाढून 1685 रुपये आणि चेन्नईमध्ये 36.5 ते 1867.5 रुपये प्रति सिलेंडर झाली.
 
एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. आपण आपल्या शहराच्या गॅस सिलिंडरची किंमत https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तपासू शकता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments