Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LPG Cylinder Price:आता फक्त 750 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (18:26 IST)
सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे सगळेच हैराण झाले आहेत. दैनंदिन घरगुती वापराच्या गोष्टी जेव्हा महाग असतात तेव्हा आपल्यावर अधिक परिणाम करतात. एलपीजी हा त्यापैकी एक आहे. तुम्हीही गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल. जर तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर सरकारी मालकीची तेल कंपनी इंडेनने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे.

ज्यामध्ये ग्राहकालागॅस सिलिंडर स्वस्तात मिळू शकेल. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत  फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळेल. म्हणजेच हा गॅस सिलिंडर सुमारे 300 रुपयांनी स्वस्त मिळेल. कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकाला फक्त 750 रुपये खर्च करावे लागतील. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. 
 
 या सिलेंडरचे वजन सामान्य सिलेंडरपेक्षा कमी आहे. सध्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. दिल्लीत 14. 2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला 750 रुपयांना सिलिंडर दिला जात आहे. एकूणच, 300 रुपयांचा स्वस्त सिलिंडर दिला जात आहे.
 
नियमित सिलेंडरपेक्षा वजनाने हलके असतात. यामध्ये 10 किलो गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत. इंडेन सध्या 28 शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असून हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनी सध्या काम करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

तुळजापूर मंदिर ट्रस्टने 12 पुजाऱ्यांवर कारवाई केली

महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढतील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

तुर्की-चीनला बसले भूकंपाचे धक्के

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments