सर्वसामान्यांसाठी स्वयंपाक करणे महाग झाले आहे. व्यावसायिक एलपीजीपाठोपाठ आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. ही वाढ शनिवारपासून म्हणजेच 7 मे 2022 पासून लागू झाली आहे. आता राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, 1 मे रोजी त्याची किंमत 102.50 रुपयांनी वाढली होती. आता दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2355.50 रुपयांवर गेली आहे.