Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात दिवाळीनंतर बैठक'- अनिल परब

'Meeting after Diwali regarding demands of ST employees' - Anil Parab
, गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:16 IST)
एसटी कर्मचाऱ्यांचा संपासंदर्भात अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि इतर मागण्यांसंदर्भात दिवाळीनंतर बैठक घेऊ असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे. राज्य सरकारसोबत ही चर्चा होईल, असंही ते म्हणाले.
 
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात अनिल परब यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि दिवाळी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे असं आवाहनही अनिल परब यांनी केलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्यात पेट्रोल 12 आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त