Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ST Strike : शरद पवारांसोबत बैठक संपली, अनिल परब म्हणाले पर्यायांवर लवकरच होणार निर्णय

ST Strike : शरद पवारांसोबत बैठक संपली, अनिल परब म्हणाले पर्यायांवर लवकरच होणार निर्णय
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (17:28 IST)
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की वेगवेगळे मार्ग आहेत त्यावर चर्चा झाली. मात्र, मार्ग निश्चित झाल्यानंतर याबाबत जाहीर केलं जाईल. 
 
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरुन सुरु असलेल्या संपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. सरकार कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आश्वासन देत असली तरी अनेक भागांमध्ये कर्मचारी संपावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक झाली.
 
संपावर तोडगा काढण्यासाठी काय पर्याय असून शकतात यावर बैठकीत चर्चा झाली. एसटीची आताची आर्थिक स्थिती, एसटी फायद्यात येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतही चर्चा केल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच कामगारांच्या संपाबाबत सकारात्मक तोडगा कसा काढता येईल याचाही विचार सुरु असल्याचं परब म्हणाले.
 
कामगारांची वेतनवाढ, इतर राज्यांमध्ये एसटीची असणारी अवस्था, हायकोर्टात सरकार काय बाजू मांडणार असे विविध मुद्दे या बैठकीत चर्चेला आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नसला तरीही अनेक पर्यायांचा विचार या बैठकीत केला गेला आहे. सामंजस्याने दोघांचे समाधान होईल, असा मध्यममार्ग काढला पाहिजे अशी चर्चा या बैठकीत झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RIP जवान पप्पाला भानूप्रसाद