Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करा, एसबीआयचे आवाहन

मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करा, एसबीआयचे आवाहन
, सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (10:20 IST)
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांपैकी जे खातेदार इंटरनेट बँकींग सुविधा वापरतात त्यांनी लवकरात लवकर आपला मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करावा असे आवाहन बँकेने केले आहे. यासाठी बँकेने १ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. असे न केल्यास बँक प्रशासनाकडून ग्राहकांची नेट बँकींग सुविधा बंद केली जाईल असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. बँकेने ‘ऑनलाइनसेबी’ या आपल्या संकेसस्थळावर ग्राहकांना ही माहिती दिली आहे.
 
आपल्या ग्राहकांना एसएमएसेस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या ग्राहकांना ही सूचना दिली आहे. सध्या व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून ग्राहकांकडून नेटबँकींगचा मोठ्या प्रमाणात वापर होते. ऑनलाईन व्यवहार करताना कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बँकेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी ग्राहकांनी आपले खाते असलेल्या शाखेशी संपर्क करणे आवश्यक असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
 
आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे की नाही असे तपासा
 
१. www.onlinesbi.com वर जाऊन लॉगइन करा
२. My Account and Profile वर जा
३. यातील Profile वर जा
४. यात Personal Details मध्ये मोबाईल या पर्यायावर क्लिक करा.
५. तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड मागितला जाईल. हा लॉगइन पासवर्डपेक्षा वेगळा असेल.
६. योग्य पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणताही आमदार मुलींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ माझ्याशी - सुप्रिया सुळे