अनेकजण रेल्वेच्या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट काढतात. एकावेळेस एका आयडी वरुन ६ तिकिटे काढण्याची मर्यादा आहे. या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १२ तिकिटांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आपल्या मित्रमंडळीसोबत किंवा नातेवाईकांसोबत जाणाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
अट आणि प्रक्रिया
आयआरसीटीसीच्या ऑनलाईन तिकीट वेबसाईटवरुन दरमहा १२ तिकीटे काढण्यासाठी तुम्हाला (आयडीधारकाला) आपला आधार नंबर रेल्वे वेबसाईटवरील अकाऊंटला जोडावा लागणार आहे. ही प्रक्रिया फार सोपी आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर my profile या सेक्शनवर क्लीक केल्यानंतर तेथे केवायसी आधार हा पर्याय मिळेल. या ऑप्शनवर क्लीक केल्यावर तिथे आधार नंबर टाकावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड प्राप्त होईल. हा कोड तुम्हाला त्या वेबसाईटवर टाकावा लागणार आहे. यानंतर तुमच्या रेल्वेच्या खात्यासोबत तुमचे आधार जोडले जाईल.