Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा भावात घसरण,११४० रुपये प्रती क्विंटल भाव

Webdunia
बुधवार, 20 जुलै 2022 (21:36 IST)
बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे माहिती येताच  कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दर घसरले आहे.  उन्हाळ कांद्याला सरासरी ११४० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.
 
नाफेडचे कांदा खरेदी शनिवारपासून थांबविण्यात आली आहे. याचा परिणाम  कांद्याच्या बाजार भावावर झाला असून मागील सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात ३५० रु. प्रति क्विंटलची घसरण झाली. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १३९४ वाहनातून सुमारे २०११२ क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजार भाव किमान ५०१ रु., कमाल १४५१ रु तर सरासरी ११४० रु प्रती क्विंटल होते. कांदा दरात घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments