Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा भाव पडले, कमावलेले ६ रुपयांची मनीऑर्डर शेतकऱ्याने दिली मुख्यमंत्री यांना

Webdunia
सध्या राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.  त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून फार संकटात सापडला आहे. त्यात  आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची थेट मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केलीय.

संगमनेरच्या अकलापूर येथील शेतकरी श्रेयस आभाळे यांनी आपल्या शेतात दोन एकर कांद्याचे पीक घेतले असून,  त्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रयोग करत अडीच लाख रुपये खर्च केले होते. संगमनेर बाजार समितीत आणलेल्या कांद्याच्या गोण्या गगनगिरी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे दिल्या असता त्यांच्याकडील चांगल्या कांद्याला २ रुपये ५१ पैशाचा, मध्यम कांद्याला ७५ पैसे आणि हलक्या कांद्यासाठी ६३ पैसे किलोचा भाव मिळाला. ५१ गोण्या विकून ३ हजार २०८ रुपये त्यांच्या हातात पडले. हा कांदा उतरवण्यासाठी हमाली वजन करण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च , वारई यावर त्यांचे ३२०२ रुपये खर्च केले.  बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांदा विक्रीतून त्यांच्या हाती अवघे फक्त सहा रुपये राहिले. त्यावर संतापलेल्या आभाळे यांनी या सहा रुपयांची मनीऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सोबतच या पैश्यातून त्यांनी शेतीविषयक पुस्तक घ्या असा सल्ला दिला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments