Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Orxa Energies : 221 किमीची रेंज, 3 वर्षांची वॉरंटी, स्वस्त इलेक्ट्रिक बाइक

Webdunia
गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (20:05 IST)
Orxa Mantis electric bike launched at Rs 3.6 lakh  : Orxa Energies ने भारतीय बाजारात तिची इलेक्ट्रिक बाईक Mantis लाँच केली आहे आणि ही बाईक सिंगल वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 1.3kW चार्जर असलेल्या या बाईकची किंमत 3.6 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जाणून घ्या काय आहेत या मस्त बाइकची वैशिष्ट्ये-
 
135 kmpl चा टॉप स्पीड: Orxa Mantis इलेक्ट्रिक बाईकमध्ये 8.9kWh चा बॅटरी पॅक आहे, जो BLDC इलेक्ट्रिक मोटरसह 28hp पॉवर आणि 93 Nm टॉर्क जनरेट करतो.
 
कंपनीने दावा केला आहे की ही बाईक 8.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा टॉप स्पीड 135 kmpl आहे. बाईकची IDC रेंज 221 किमी आहे. त्याचा 3.3 kW चा चार्जर 2.5 तासात बाईक 0-80% चार्ज करू शकतो. कंपनी या इलेक्ट्रिक बाइकच्या मोटर आणि बॅटरी पॅकवर 3 वर्षांची (किंवा 30,000 किमी) वॉरंटी देत ​​आहे.
 
इतर वैशिष्ट्ये काय आहेत: इलेक्ट्रिक बाइकमध्ये लिनक्स-आधारित Orxa ऑपरेटिंग सिस्टम, सर्व LED लाइटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशनसह एक मॅन्टिस अॅप, मोबाइल नोटिफिकेशन्स, राइड अॅनालिटिक्स यासारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
 
काय आहे किंमत : बाईकचे ऑनलाइन बुकिंगही सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्याचे बुकिंग करता येईल. पहिल्या 1,000 ग्राहकांसाठी बुकिंग रक्कम 10,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि त्यानंतर बुकिंग करणाऱ्यांसाठी ही रक्कम 25,000 रुपये होईल. बाईकची किंमत 3.6 लाख रुपये (एक्स-शोरूम बंगलोर) आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments